पाणीपुरवठा

  • homeपाणीपुरवठा

जलजीवन मिशनअंतर्गत भोर–राजगड–मुळशी विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांच्या वीजपुरवठा कामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून ₹८९ लाख ९५ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे मतदारसंघातील १५ गावांमधील पाणीपुरवठा योजनांच्या वीजपुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत होणार असून, नागरिकांना स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास मोठी मदत मिळणार आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत भोर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या वीजपुरवठा कामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून ₹९० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे भोर तालुक्यातील २० गावांमधील पाणीपुरवठा योजनांच्या वीजपुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत होणार असून, नागरिकांना स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.