भोर–राजगड–मुळशी विधानसभा मतदारसंघ हा ग्रामीण, डोंगराळ आणि निमशहरी भागांचा समावेश असलेला भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण मतदारसंघ आहे. या मतदारसंघात शेती, जलसंधारण, रस्ते, शिक्षण, आरोग्य सुविधा, पर्यटन आणि मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. या सर्व गरजा लक्षात घेऊन आ. श्री शंकर हिरामण मांडेकर मतदारसंघाच्या सर्वांगीण, संतुलित आणि शाश्वत विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) यांच्या वतीने आयोजित ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना’ शुभारंभ, भव्य शेतकरी मेळावा आणि आदर्श शेतकरी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, कृषिमंत्री दत्तामामा भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आणि बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते. शंकर हिरामण मांडेकर यांनी या कार्यक्रमात सहभागी होत शेतकरी कल्याण, सहकार चळवळीचे महत्त्व आणि कृषी विकासासाठी आर्थिक सहाय्याची गरज अधोरेखित केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जसुविधा उपलब्ध होऊन आधुनिक शेती, कृषी विकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी नावीन्यपूर्ण आणि आधुनिक शेती करणाऱ्या आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. “शेतकरी सक्षम तर महाराष्ट्र सक्षम” हा विचार पुढे नेत शेतकरी सक्षमीकरण, सहकार क्षेत्राची मजबुती आणि कृषी विकासासाठी सातत्याने कार्य करण्याची बांधिलकी शंकर हिरामण मांडेकर यांनी व्यक्त केली.